छिछोरे, चमकोगिरी वरून महासभेत भाजप-सेनेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:03+5:302021-08-13T04:21:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील नागरिक खराब रस्ते, सोयी सुविधांअभावी त्रस्त असताना, या विषयांवर तोडगा काढण्याचे सोडून गुरुवारी ...

Khadajangi in BJP-Sena in the General Assembly from Chhichore, Chamkogiri | छिछोरे, चमकोगिरी वरून महासभेत भाजप-सेनेत खडाजंगी

छिछोरे, चमकोगिरी वरून महासभेत भाजप-सेनेत खडाजंगी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील नागरिक खराब रस्ते, सोयी सुविधांअभावी त्रस्त असताना, या विषयांवर तोडगा काढण्याचे सोडून गुरुवारी झालेल्या महासभेत छिछोरे, चमकोगिरी आणि धमक्या अशा शब्दांचा वापर करून भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला. गाळेधोरणावर निर्णय घेण्याच्या मुद्द्यावरून भाजप व शिवसेना नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद झाला. बहुमताच्या जोरावर शिवसेनेने मनपाच्या ताब्यात असलेले गाळे व हॉल लिलावानुसारच वाटप करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला.

महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिकेची ऑनलाईन महासभा घेण्यात आली. यावेळी उपमहापौर कुलभुषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. महासभेत एकूण ८३ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७६ विषयांना मंजुरी देण्यात आली. तर इतर विषय तहकुब व रद्द करण्यात आले. मनपा प्रशासनाने आपल्याकडे जप्त असलेल्या ६६ गाळे व हॉल चा लिलाव करून ३० वर्षांच्या करारावर देण्याचा प्रस्ताव महासभेत आणला होता. या प्रस्तावाला भाजपने विरोध केला.

कुलभुषण पाटील व कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक वाद

गाळ्यांबाबत धोरण ठरविण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना, शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु झाले. त्यात उपमहापौर अधून- मधून काही सूचना देत होते.या दरम्यान उपमहापौरांनी तिथे बसून छिछोरे धंदे करु नये असे म्हणताच उपमहापौर पाटील यांनी प्रत्युत्तर देत आपण चमकोगिरी करु नका? असे सांगितल्याने शाब्दिक वाद वाढत, एकमेकांना धमक्या देण्याइतपत हा वाद वाढला. त्यानंतर दोन्हीही पदाधिकाऱ्यांनी माघार घेत वाद मिटविला.

गाळ्यांचा प्रश्न ताटकळत ठेवण्याचा भाजपचा धंदा - नितीन लढ्ढा

गाळेधोरणावर चर्चा सुरु असताना, या विषयाला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. मात्र, हा विषय मंजुर झाला तर मनपाचे उत्पन्न वाढेल अशी भूमिका सेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी घेतली. मात्र, नव्याने जे गाळे ताब्यात घेतले जातील त्यावर देखील हाच निर्णय घेता जाईल त्यामुळे भाजप नगरसेवकांनी या विषयाला विरोध सुरुच ठेवला. त्यावर नितीन लढ्ढा यांनी संतप्त होवून भाजपच्या भूमिकेवर टीका केली. गाळेधारकांची दिशाभूल करून गाळ्यांचा प्रश्न ताटकळत ठेवण्याचा भाजपचा धंदा असल्याची टीका लढ्ढा यांनी केली.

आसोदा रेल्वे पुलाला बहिणाबाई चौधरींचे नाव

आसोदा येथील रेल्वेगेटवर होत असलेल्या उड्डाणपुलाला आसोदा येथील माहेरवाशीन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी मांडला होता. या ठरावाला महासभेत बहूमताने मंजुरी देण्यात आली. यासह प्रभात चौकात होत असलेल्या उड्डाणपुलाला क्रांतीसुर्य महाराणा प्रतापसिंह यांचे नाव देण्याचा ठरावाला देखील महासभेत मंजुरी मिळाली.

निष्क्रिय आयुक्तांची बदली करा - प्रशांत नाईक

शहरातील अनेक विकासाची कामे प्रलंबित असताना, मनपा आयुक्तांकडून कामे थांबविली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला. तसेच मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची सेवानिवृत्ती आधीच बदली करा किंवा त्याच्या विरोधात अविश्वास ठराव आणा अशी मागणी नाईक यांनी केली. याच मुद्द्यावर नितीन लढ्ढा यांनी देखील मनपा प्रशासनाला धारेवर धरत जर कामे होत नसतील तर मनपाच बरखास्त करण्याची मागणी लढ्ढा यांनी केली.

Web Title: Khadajangi in BJP-Sena in the General Assembly from Chhichore, Chamkogiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.