कारगिल विजय दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:09+5:302021-07-27T04:18:09+5:30
२ ऑगस्ट रोजी लोकशाही दिन जळगाव : जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन ...

कारगिल विजय दिवस साजरा
२ ऑगस्ट रोजी लोकशाही दिन
जळगाव : जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे. ज्या नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधींची नेमणूक
जळगाव : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर प्रतिनिधींची नेमणूक केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
कारगिल विजय दिन साजरा
जळगाव : मानव सेवा विद्यालयात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, माया अंंबटकर, मुक्ता पाटील आदी उपस्थित होते.
गुरुपौर्णिमा साजरी
जळगाव : सिखवाल ब्राह्मण समाज संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्ष प्रकाश जोशी, उपाध्यक्ष रवी पांडे, मनोज पांडे, पंकज शर्मा, सचिव निखिल शर्मा, हर्षल सिखवाल, शुभम ओझा, यश तिवारी, मोहिती...................... जोशी आदी उपस्थित होते.