शरद जोशी यांचे विश्वासू शिलेदार कडू आप्पा पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 16:44 IST2022-10-10T16:43:29+5:302022-10-10T16:44:51+5:30
कडू आप्पा यांनी शरद जोशी यांच्यासोबत अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला.

शरद जोशी यांचे विश्वासू शिलेदार कडू आप्पा पाटील यांचे निधन
यावल जि. जळगाव - शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे जिल्ह्यातील विश्वासू शिलेदार कडू आप्पा उर्फ गणेश दिनकरराव पाटील (७१) यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने किनगाव ता. यावले येथील राहत्या घरी निधन झाले. ते शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष होते.
इच्छेनुसार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयास देहदान करण्यात आले. ते कडू आप्पा नावाने ते परिचित होते. कडू आप्पा यांनी शरद जोशी यांच्यासोबत अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे जोशी यांचे ते विश्वासू सहकारी बनले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. भूषण गणेश पाटील, सून नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.