पळून जाण्यास नकार दिल्याने जानवे येथे विवाहितेवर तलवारीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:09 IST2018-03-13T13:09:19+5:302018-03-13T13:09:19+5:30
पतीवरही केला हल्ला

पळून जाण्यास नकार दिल्याने जानवे येथे विवाहितेवर तलवारीने वार
आॅनलाइन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. १३ - जुन्या रूढी प्रमाणे भाकरी मागणाºया विवाहित महिलेला पळून जाण्याचा आग्रह करणाºया तरुणाने पती पत्नीवर तलवारीचा हल्ला करून जखमी केल्याची घटना १२ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर तालुक्यातील जानवे येथे घडली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जानवे येथे जुन्या रूढी प्रमाणे १२ रोजी सकाळी ९ वाजता एक विवाहिता गावात भाकरी मागत असताना अजय मंगल पारधी हा तिच्या मागोमाग गेला व तिला सोबत पळून जाण्यासाठी आग्रह केला. यावरून वाद झाले. त्यावेळी अजय याने तलवारीने विवाहित महिलेच्या डाव्या हातावर व पायावर हल्ला केला तसेच तिच्या पतीच्या डाव्या पायाच्या पंजावरही हल्ला केला. दोघांना तत्काळ धुळे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अमळनेर पोलीस स्टेशनला अजय व त्याची आई मुन्नीबाई मंगल पारधी यांच्या विरुद्ध भादवी 326, 504,506 , 34 व शस्र कायदा 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन अजयला अटक करण्यात आले. तपास हेड कोन्स्टेबल सुभाष महाजन करीत आहेत