जळगाव तालुक्यातील भादली येथे चोरट्यांनी कापला बोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 12:47 IST2018-06-16T12:47:48+5:302018-06-16T12:47:48+5:30

घराचा दरवाजा मध्यरात्री उघडण्याचा प्रयत्न

Junk hawk chopped off at Bhadli in Jalgaon taluka | जळगाव तालुक्यातील भादली येथे चोरट्यांनी कापला बोकड

जळगाव तालुक्यातील भादली येथे चोरट्यांनी कापला बोकड

जळगाव : भादली बु़ येथील सरपंच उज्ज्वला सुनील बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा मध्यरात्री चोरट्यांनी उघडण्याचा प्रयत्न केला़ मात्र, अपयश आल्यामुळे चोरट्यांनी चक्क घराबाहेर बांधलेला बोकडच कापल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आला़ याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे़
सरपंच उज्ज्वला बाविस्कर ह्या पती सुनील यांच्यासह भादली बु़ येथे वास्तव्यात आहेत़ घराजवळ लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे सुनील बाविस्कर हे तेथे गेले होते़ कार्यक्रम २ वाजता आटोपल्यानंतर सुनील बाविस्कर हे घरी आले़ मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला़ परंतू, त्यांना दरवाजा उघडता आला नाही़
अखेर चोरट्यांनी घरा बाजूला बांधलेला बाविस्कर यांचा बोकडा चोरून नेला़ आणि काही अंतरावर त्याला कापले़ सकाळी बकऱ्या चारणारा तरूण हा बाविस्कर यांच्या घरी आल्यावर त्याने बोकडा नसल्याचे त्यांना दाखविले़ बोकड्याचा शोध घेतल्यावर काही अंतरावर बोकड्याचे तुकडेच सापडले़ यानंतर सुनील बाविस्कर यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली़ पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ परंतू, काहीही मिळाले नाही़

Web Title: Junk hawk chopped off at Bhadli in Jalgaon taluka