सातगावला उद्या गैबनशाहवली बाबांची यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:30 IST2019-02-02T17:29:06+5:302019-02-02T17:30:31+5:30
सातगाव, ता. पाचोरा : हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले गैबनशाहवली बाबांची यात्रोत्सव ४ रोजी होणार आहे. या यात्रेसाठी बाहेरगावी असलेले ...

सातगावला उद्या गैबनशाहवली बाबांची यात्रा
सातगाव, ता. पाचोरा : हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले गैबनशाहवली बाबांची यात्रोत्सव ४ रोजी होणार आहे. या यात्रेसाठी बाहेरगावी असलेले मंडळीही यात्रेसाठी आवर्जून गावी येतात.
शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेले गैबनशाहवली बाबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असते. या यात्रेने सर्वधर्मसमभावाची भावना वाढीस लागते. या दिवशी गोडभात म्हणून घराघरात न्याज बनवली जाते. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान गावातील प्रत्येक घरातील स्त्री नैवेद्य घेऊन पीरबाबाकडे जाते. यावेळी सर्व जाती-धर्माचे लोक एकाच रांगेत उभे राहून दर्शन घेत असतात. सर्वच समाजाचे श्रद्धा स्थान असल्याने पीरबाबांचे दर्शन घेतात. यात्रेत लहान मुलांसाठी रहाटपाळणे, खेळणे यात्रेत येतात. या यात्रेत यात्रेकरू जिलेबीचा आस्वाद घेत असतात.