जे.के. पार्कची जागा अजूनही मनपाच्या ताब्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:14+5:302021-02-05T05:53:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एके काळी जळगावकरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या जे.के. पार्कला काही वर्षांपासून घरघर लागली. ही जागा ...

J.K. The park site is still not in the possession of the corporation | जे.के. पार्कची जागा अजूनही मनपाच्या ताब्यात नाही

जे.के. पार्कची जागा अजूनही मनपाच्या ताब्यात नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एके काळी जळगावकरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या जे.के. पार्कला काही वर्षांपासून घरघर लागली. ही जागा तत्कालीन नगरपालिकेने जे.के. डेव्हलपर्सला ३० वर्षांसाठी दिली होती. याची मुदत २०१९ मध्ये संपली आहे. मात्र वर्षभरानंतरही ही जागा मनपाच्या ताब्यात देण्यात आली नाही. या जागेची ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी कोट्यवधी रुपयांची मनपाच्या मालकीची जागा बेवारस पडून असल्याचे दिसून आले.

शिवाजी उद्यानातील १०,९२५ चौरस मीटर जागा पिकनिक स्पॉट विकसित करण्यासाठी १७ जुलै १९८९ रोजी दिली होती. याची मुदत २५ डिसेंबर २०१९ रोजी संपली आहे. मात्र तरीही ही जागा या संस्थेने मनपाला दिलेली नाही. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी मनपाने प्रक्रिया सुरू केली आहे.

सुरुवातीला ५ जानेवारीला मनपाने या प्रकरणात नोटीस बजावली होती. त्यात १३ जानेवारीला संबंधित प्रकरणात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र १३ जानेवारीला संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी मनपात उपस्थित राहत खुलासा सादर करण्यास मुदतवाढ मागितली आहे. नंतर २० जानेवारी रोजी खुलासा सादर केला आहे. या प्रकरणावर पुढच्या आठवड्यात मनपा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पार्कमध्ये प्रवेश बंदी

या पार्कमध्ये सध्या कुणालाही प्रवेश करण्यास बंदी आहे. लोखंडी साखळीने पार्कच्या गेटला बंद करण्यात आले आहे. तसेच तेथे २४ तास चौकीदार आहे. चौकीदार कुणालाही पार्कमध्ये प्रवेश करू देत नाही. पार्कमध्ये जुनी खेळणी गंजत पडली आहेत. तसेच ठिकठिकाणी गवत उगवले आहे. पार्कमध्ये आताही काही खेळणी आहेत. तसेच एक छोटे स्टेजदेखील उभारण्यात आले आहे.

कोट -

महापालिकेने जे.के. डेव्हलपर्सला ही जागा पुन्हा मनपाच्या ताब्यात देण्यासाठी नोटीस बजावली आहे. १३ जानेवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मुदतवाढ मागितली २० जानेवारीला या प्रकरणात त्यांच्या प्रतिनिधींनी येऊन लेखी खुलासा सादर केला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. - प्रशांत पाटील, उपायुक्त

Web Title: J.K. The park site is still not in the possession of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.