शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

नक्षलवादी हल्ल्यात तारखेडा खु. येथील जवान बालंबाल बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 14:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाचोरा : नुकताच छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु. येथील ...

ठळक मुद्देगंभीर जखमी अवस्थेतून उपचार घेतल्यानंतर परतले गावीगावकऱ्यांनी मिरवणूक काढून केला सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्कपाचोरा : नुकताच छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु. येथील सुपुत्र कमांडो दीपक अशोक पाटील हे बालंबाल बचावले आहे.गंभीर जखमी अवस्थेतून उपचार घेऊन ते सुट्टीवर गावी परतले आहे. त्यांची मिरवणूक काढून गावकऱ्यांनी सत्कार केला.याबाबत प्राप्त माहिती अशी की, तारखेडा खु. चे रहिवासी दिपक अशोक पाटील हे कोब्रा बटालियन २०६मध्ये कमांडो म्हणून सेवा बजावत आहेत. काही दिवसांपूर्वी छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त बुरकपाल कॅम्पच्या ६ कि मी अंतरावर रात्री ८च्या सुमारास गस्त घालत असताना नक्षली माओवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला.या स्फोटात कोब्रा बटालियन २०६ चे निरीक्षक नाशिकचे सुपूत्र नितीन भालेराव हे शहीद झाले. याच ठिकाणी दीपक यास पिण्यासाठी पाणी आणण्यास सांगितले असता बाजूला गेलेले दीपक पाटील हे गंभीर जखमी झाले. दैव बलवत्तर असलेले पाटील हे स्फोटात बालंबाल बचावले. त्यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर गावी सुट्टीवर आले असता गावकऱ्यांनी व मित्रांनी वाजत गाजत मिरवणूक काढून सत्कार केला.गावकऱ्यांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी दिपक पाटील बजावत असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोराSoldierसैनिक