जामनेरला पोलिसांकडून चोरट्यांचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:38+5:302021-08-13T04:20:38+5:30
जामनेर : ड्रायफ्रुटच्या दुकानाचे शटर उचकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार चोरट्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून पकडले. हा प्रकार बुधवारी ...

जामनेरला पोलिसांकडून चोरट्यांचा पाठलाग
जामनेर : ड्रायफ्रुटच्या दुकानाचे शटर उचकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार चोरट्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून पकडले. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडला. पोलिसांना पाहताच चोरट्यांनी त्यांचेजवळील दुचाकी जागेवरच सोडून पळ काढल्याने पोलिसांनीदेखील वाहनातून उतरून त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग केला.
मथाई नगरमधील ड्रायफूटच्या दुकानाबाहेर दुचाकी लावून लोखंडी टॉमीने शटर उचकविण्याच्या प्रयत्नात असताना पहूर रोडवर गस्तीवरील पोलिसांनी वाहन मथाई नगरकडे वळविले. याठिकाणी चौघे संशयित चोरीचा प्रयत्न करीत होते. पोलिसांना पाहताच त्यांनी दुचाकी जागेवर सोडून पळ काढला. पोलिसांनी गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी गुणवंत सोनवणे, अमोल घुगे, विनोद पाटील, अमोल वंजारी, चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, ज्ञानेश्वर देशमुख, सोनुसिंग ठोबल, रियाज शेख, तुषार पाटील, रामदास कुंभार आदींनी पाठलाग करीत सुरुवातीला रवींद्र कोळी (रा. जळगाव) यास ताब्यात घेतले. त्यानंतर शोध मोहीम राबवित इतर तिघांना पहाटे ताब्यात घेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. अमोल घुगे यांचे फिर्यादीवरून चौघा संशयितांविरोधात भादंवि कलम ४५७, ३८० व ५११ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. कोळी वगळता यातील तिघे अल्पवयीन असल्याची माहिती पोलीसांनी दिली.