जामनेरला सफाई कामगारांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:45+5:302021-09-12T04:20:45+5:30
जामनेर : शहरात गेल्या सहा दिवसापासून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरील कामगारांनी काम बंद केल्याने विविध भागात कचरा साचल्याने आरोग्याची ...

जामनेरला सफाई कामगारांचे काम बंद
जामनेर : शहरात गेल्या सहा दिवसापासून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरील कामगारांनी काम बंद केल्याने विविध भागात कचरा साचल्याने आरोग्याची समस्या बिकट झाली आहे. आरोग्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी सांगितले.
गेल्या महिन्यातदेखील ठेकेदाराबाबत तक्रार आल्याने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना बोलावून नोटीस बजावली होती. ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगारांनी काम बंद केल्याने पुन्हा आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
आरोग्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता कचरा संकलनाचे काम बंद केले आहे. पालिकेने त्यांना तिसरी नोटीस पाठविली आहे. आपण तातडीने काम सुरू करावे अन्यथा कारवाई केली जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे.
- चंद्रकांत भोसले, मुख्याधिकारी, न.प. जामनेर
110921\11jal_4_11092021_12.jpg
जामनेर येथील भाजी मंडईतील कचरा कुंडीत व परिसरात साचलेला कचरा.