जळगावकर अनुभवणार ‘झिरो शॅडो डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:51 IST2020-05-21T19:50:23+5:302020-05-21T19:51:00+5:30
जळगाव : माणसाची साथ त्याची सावली कधीच सोडत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. यासावलीची एक अनुभूती अर्थात ‘झिरो शॅडो ...

जळगावकर अनुभवणार ‘झिरो शॅडो डे’
जळगाव : माणसाची साथ त्याची सावली कधीच सोडत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. यासावलीची एक अनुभूती अर्थात ‘झिरो शॅडो डे’ जळगावकरांना सोमवार आणि मंगळवारी अनुभवता येणार आहे. या दोन्ही दिवशी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी खगोलप्रेमी अमोघ जोशी यांच्यातर्फे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे़ या प्रात्यक्षिकाचे फेसबूक लाईव्हद्वारे प्रक्षेपण केले असल्यामुळे खगोलप्रेमींना सावली कशी गायब होते, हे पाहण्याची संधी मिळणार आहे.
२१ मार्च रोजी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर म्हणजे ० अक्षांशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो. भूतलावरील प्रत्येक शहर हे वेगवेगळ्या अक्षांशावर वसले असून, त्यानुसार जळगाव शहर हे २१.०० अंश उत्तर या अक्षांशावर आहे. तसेच कर्कवृत्ताच्या जवळ आहे. दरवर्षी २१ मार्च ते २१ जून या उत्तरायणाच्या काळात २५ मे रोजी सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून दरवर्षी जळगाव शहरात १२ वाजून २४ मिनिटांनी झिरो शडो डे असतो. या दिवसाला शून्य सावली दिवसही म्हणतात. २१ जून नंतर परतीच्या प्रवासात १६ जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे शून्य सावली दिवस असतो.
लाईव्ह प्रक्षेपण होणार
उत्तरायणाच्या काळात उत्तर दिशेकडे हळूहळू सरकतांना सूर्य एका अक्षांशावर साधारण दोन दिवस असतो. त्यामुळे शून्य सावलीचे प्रात्यक्षिक २५ आणि २६ मे असे दोन दिवस खगोल प्रेमी अमोघ जोशी यांच्याकडून दाखविण्यात येणार आहे. लॉकडाउनमुळे कार्यक्रम घेणे शक्य नसल्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे़ त्यामुळे या भौगोलिक घटनेचा खगोल प्रेमींना आनंद घेता येणार आहे.