जळगाव : जामनेरनजीक शेतातून सहा हजारांचे लिंबू चोरीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:52 IST2023-04-12T16:45:33+5:302023-04-12T16:52:18+5:30
उन्हाळ्यामुळे बाजारात लिंबांचा दर वधारला असून १३० ते १४० रुपये प्रति किलो आहे.

जळगाव : जामनेरनजीक शेतातून सहा हजारांचे लिंबू चोरीस
मोहन सारस्वत
जामनेर, जि. जळगाव : हिवरखेडे बुद्रुक (ता. जामनेर) येथील एका शेतातून सहा हजार ६०० रुपये किमतीचे ६० किलो लिंबू चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. उन्हाळ्यामुळे बाजारात लिंबांचा दर वधारला असून १३० ते १४० रुपये प्रति किलो आहे.
हिवरखेडे बुद्रुक येथील जितेंद्र पाटील यांचे शेतातून सकाळी तीन मुले लिंबू नेताना प्रकाश पाटील यांना दिसली. त्यांनी त्यांना विचारले असता गावातील एकाने मळा विकत घेतल्याचे सांगितले. ही बाब पाटील यांनी शेतकरी जितेंद्र पाटील यांना सांगितली.
पाटील यांनी याबाबत शहानिशा केली असता जामनेर येथील एकाच्या घरात लिंबू आढळून आले. या प्रकरणी तीन संशयितांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.