जळगावात महिलेची ५० हजारांची सोनसाखळी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 11:45 IST2017-12-09T11:41:59+5:302017-12-09T11:45:18+5:30

ख्वॉजामियॉ दर्गा परिसरातील रात्री आठ वाजेची घटना

In the Jalgaon, the woman will have 50 thousand gold chainles | जळगावात महिलेची ५० हजारांची सोनसाखळी लांबविली

जळगावात महिलेची ५० हजारांची सोनसाखळी लांबविली

ठळक मुद्देमहिला दुचाकीवरून जात असताना तिघांनी पळविली सोनसाखळीकाही तरुणांनी केला चोरट्यांचा पाठलागजिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.९ : शहरातील अत्यंत वर्दळीच्या ख्वॉजामियॉ दर्गा परिसरातील पेट्रोलपंपानजीक रात्री सव्वाआठ वाजता एका महिलेची ५० हजार किमतीची सोनसाखळी लांबविली.
एलआयसीच्या पिग्मी एजंट असलेल्या मीना बिपीन डोकानिया (४९) या दुचाकी (आरजे १९- एएस ८९००)ने गणेश कॉलनीतून रिंग रोडवरील शंकर वाडीतील त्यांच्या निवासस्थानी जात असताना त्यांच्या दुचाकीच्या मागे तीन तरुण मोटरसायकलने आले, त्यांनी मीना यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी लांबवली व धूम स्टाईलने पिंप्राळा रेल्वे गेटकडे पळाले. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. रेल्वेगेट बंद असल्याने ते बजरंग बोगद्याकडे पळाले, त्यामुळे ते हाती लागले नाही. याप्रकरणी मीना डोकानिया यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरुन अज्ञात तीन तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: In the Jalgaon, the woman will have 50 thousand gold chainles