शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

जळगावात विद्यार्थिनीने ‘एमपीएससी’ची उत्तरपत्रिका नेली घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 12:48 IST

विद्यार्थिनीविरुध्द गुन्हा

ठळक मुद्देधक्कादायक प्रकार११९८ उमेदवारांची दांडी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ - महाराष्टÑ लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवारी घेण्यात आलेल्या महाराष्टÑ दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब पूर्व परीक्षेचा पेपर संपल्यानंतर उत्तर पत्रिका घरी नेणाऱ्या हर्षा प्रभाकर पाटील (रा.वाघ नगर, जळगाव) या विद्यार्थिनीविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, केसीई सोसायटी कॉलेज आॅफ एज्युकेशन अ‍ॅँड फिजिकल एज्युकेशन, मू.जे.महाविद्यालय परिसरातील उपकेंद्र क्र.जे.एल.०९ या ठिकाणी रविवारी महाराष्टÑ लोकसेवा आयोगामार्फत महाराष्टÑ दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब पूर्व परीक्षा घेण्यात आली. या केंद्रावर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील वरिष्ठ सहायक गोपाळ बाबुराव संत यांची समवेक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. सकाळी ११ ते १२ या वेळेत परीक्षेचा लेखी पेपर होता. दुपारी बारा वाजता पेपर सुटल्यानंतर समवेक्षक संत उत्तर पत्रिका जमा करीत असताना पहिल्या रांगेतील हर्षा पाटील ही विद्यार्थिनी उत्तरपत्रिका (क्र.१३२०३१९) घेऊन दरवाजाच्या बाहेर गेली. आवाज दिला असता हर्षा ही पळून गेली असे संत यांनी तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर विद्यार्थिनी हजरया प्रकरणी समवेक्षक संत यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. हर्षा हिने सादर केलेल्या आधारकार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्राच्या झेरॉक्सवर वरणगाव फॅक्टरीचा पत्ता होता. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता हर्षा ही सायंकाळी रामानंद नगर पोलिसात उत्तरपत्रिकेसह हजर झाली. पोलिसांनी ही उत्तरपत्रिका जप्त केली. जामीनपात्र गुन्हा असल्याने तिला अटक झाली नाही.चुकून उत्तरपत्रिका घरी घेवून गेले : विद्यार्थिनीविद्यार्थिनी उत्तरपत्रिका घेऊन गेल्याची माहिती केंद्राच्या बाहेर गेल्यानंतर एकच खळबळ उडाली.स्थानिक पातळीवर प्रशासनातील अधिकारी यांनी ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सायंकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणात उत्तरपत्रिका पॅडला लावलेली राहून गेली, त्यामुळे चुकून ही उत्तरपत्रिका घरी गेल्याचा दावा विद्यार्थिनीने केलेला आहे. या उत्तरपत्रिकेत काही प्रश्नांची उत्तरे लिहिलेली नव्हती, अशीही माहिती सूत्रांनी दिली.११९८ उमेदवारांची दांडीशहरातील २० केंद्रांवर रविवारी ही परीक्षा झाली. एका केंद्रावरील विद्यार्थिनीने उत्तरपत्रिका घरी घेऊन जाण्याच्या प्रकाराव्यतिरिक्त परीक्षा सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.या परीक्षेसाठी एकूण ६२४८ उमेदवार होते. यापैकी ५०५० उमेदवारांनी परीक्षा दिली तर तब्बल ११९८ उमेदवार गैरहजर होते.परीक्षा केंद्रावरुन घरी घेऊन गेलेल्या विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका स्वीकारली जाणार नाही.-अभिजित भांडे- पाटील, उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव