Jalgaon: उद्धव ठाकरे २३ रोजी दिवसभर पाचोरा दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 19:10 IST2023-04-12T19:09:55+5:302023-04-12T19:10:29+5:30
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दि.२३ रोजी पाचोरा दौऱ्यावर येत आहे. ते दिवसभर पाचोरा येथे थांबणार असून रात्री छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत, अशी माहिती संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली.

Jalgaon: उद्धव ठाकरे २३ रोजी दिवसभर पाचोरा दौऱ्यावर
- कुंदन पाटील
जळगाव : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दि.२३ रोजी पाचोरा दौऱ्यावर येत आहे. ते दिवसभर पाचोरा येथे थांबणार असून रात्री छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत, अशी माहिती संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली.
दि.२३ रोजी सकाळी ११ वाजता ते विमानाने जळगावकडे निघतील. दुपारी १२.३० वाजता जळगावहून ते पाचोरा येथे जातील. त्याठिकाणी भोजनासह नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे. दुपारी ४.३० वाजता ते माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण व कृषी जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे उदघाटन करणार आहेत. त्यानंतर ते काही वेळ निर्मल सीडस्वर थांबतील.सायंकाळी सहा वाजता ते शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी जाणार आहेत. एम.एम.महाविद्यालयाच्या प्रांगणावर त्यांची सभा होईल. त्यानंतर ते काही भेटीगाठी घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.