जळगाव सराफ बाजारात दोघांवर ब्लेडने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 11:26 IST2019-02-22T11:25:25+5:302019-02-22T11:26:34+5:30

आरोपी बिलेट पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon Saraf market attacked the blade with two | जळगाव सराफ बाजारात दोघांवर ब्लेडने हल्ला

जळगाव सराफ बाजारात दोघांवर ब्लेडने हल्ला


जळगाव : सराफ बाजारातील गटारींमध्ये सोन्याचे कण शोधणाऱ्या दोन तरुणावर पैशासाठी रवी गोपाल सोनवणे उर्फ बिलेट नावाच्या तरुणाने ब्लेडने हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. विनोद गोंविदा बिºहाडे (२२) व विकास वामन बिºहाडे (दोघे रा. पिंप्राळा हुडको) अशी जखमींची नावे आहेत. यातील विनोद याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको भागातील विनोद बिºहाडेसह अशोक शिरसाठ, संदीप शिरसाठ, अशोक सपकाळे, भगवान गायकवाड, दीपक मरसाळे, मनोज मरसाळे आदी तरुण सराफ बाजारातील गटारीत सोन्याचे कण शोधतात. कधी तरी त्यांच्या हाताला कण लागतात. कधी कधी तर दिवसभर मेहनत घेऊनही काहीच मिळत नाही, असे असताना मात्र कामाच्या ठिकाणी किंवा घरी आल्यावर रवी गोपाल सोनवणे उर्फ बिलेट हा धमकावून दारु पिण्यासाठी पैसे मागतो. कंटाळलेल्या या तरुणांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बिलेटला गुरुवारी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Jalgaon Saraf market attacked the blade with two