शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

Jalgaon: शीतपेयाच्या नावाखाली बनावट देशी दारूची निर्मिती, ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांना अटक

By विजय.सैतवाल | Published: May 04, 2024 4:24 PM

Jalgaon News: शीतपेय निर्मितीच्या नावाखाली देशी दारु तयार करणाऱ्या जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरामधील कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून ४५ हजार दारुच्या सीलबंद बाटल्यांसह ७५ लाख  ६४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

- विजयकुमार सैतवालजळगाव - शीतपेय निर्मितीच्या नावाखाली देशी दारु तयार करणाऱ्या जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरामधील कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून ४५ हजार दारुच्या सीलबंद बाटल्यांसह ७५ लाख  ६४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवार, ४ मे रोजी पहाटे करण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी तपासणी, कारवाई केली जात आहे. त्यात जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात बनावट देशी दारु निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथक के - १० सेक्टरमध्ये पोहचले. त्या ठिकाणी मंदार आयुर्वेदीक प्रोडक्ट या नावाच्या कंपनीत जाऊन पाहणी केली असता तेथे शीतपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारुची निर्मिती केली जात असल्याचे आढळून आले.मध्यरात्री अडीच वाजता पथक बनावट देशी दारुच्या कारखान्यावर पोहचले असता दरवाजा बंद करून आतमध्ये पाच जण बनावट मद्याची निर्मिती करून ती बाटलीत भरत असल्याचे आढळून आले. या पाचही जणांना पथकाने अटक केली. 

तयार बॉक्ससह ‘देशी’ने भरलेले बॅरलकंपनीच्या ठिकाणी देशी दारु रॉकेट संत्रा ब्रॅण्डचे ९० मि.ली. क्षमतेच्या ४५ हजार सीलबंद बाटल्या ठेवलेले ४५० बॉक्ससह देशी दारुने भरलेले बॅरलही आढळून आले. ४६ लाख २५ हजार रुपयांच्या दारुसह  प्रत्येकी एक हजार लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक टाक्या, प्रत्येकी २०० लिटर क्षमतेच्या दोन स्पिरीटच्या रिकामाच्या टाक्यादेखील तेथे आढळून आल्या. 

कंपनीमध्ये ९० मि.ली. क्षमतेच्या एक लाख रिकाम्या बाटल्या,  ८० हजार पत्री बूच, बॅच क्रमांक असलेले दोन लाख लेबल, रॉकेट संत्र्याचे पुठ्ठे, पार्टीशन,  लेबल पट्टीचे मशीन, सील करण्याचे मशीन, पाण्याच्या मोटार, नळी, आरओ मशीन, एमएच १९, सीवाय ३९३२ क्रमांकाचे मालवाहू वाहन, एक फ्रीज, कुलर, टेबल, स्टूल, फॅन, दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. 

बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजताच अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूकन, निरीक्षक डी.एम. चकोर, दुय्यम निरीक्षक एस.बी. चव्हाणके, एस.बी. भगत, सी.आर. शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, जवान गिरीश पाटील, सुरेश मोरे, पी.पी. तायडे, दिनेश पाटील, गोकूळ अहिरे, धनसिंग पावरा, एस.आर. माळी, विपूल राजपूत, आर.टी. सोनवणे, व्ही.डी. हटकर, एम.एम. मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांचे पथक सदर कारखान्याच्या ठिकाणी धडकले. कारवाई करत तीन ट्रक भरून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईदरम्यान सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही भेट देऊन पाहणी केली.  या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास विभागीय निरीक्षक डी.एम. चकोर करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी