Jalgaon: पिंपळगाव गोलाईतजवळ खाजगी बस जळून खाक: २५ प्रवाशांसह चालक आणि वाहक बचावले

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: May 27, 2025 14:13 IST2025-05-27T14:12:16+5:302025-05-27T14:13:14+5:30

Jalgaon News: पुणे ते  बऱ्हाणपूर- धारणी जाणारी  खाजगी बस  पिंपळगाव गाव गोलाईत ता.जामनेर जि.जळगाव येथे बसने पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. सुदैवाने यातील पंचवीस प्रवासी, चालक व वाहक  बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे.  जामनेर- पहूर रस्त्यावर हि घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास मंगळवारी घडली आहे.

Jalgaon: Private bus burnt down near Pimpalgaon Golait: Driver and conductor along with 25 passengers survived | Jalgaon: पिंपळगाव गोलाईतजवळ खाजगी बस जळून खाक: २५ प्रवाशांसह चालक आणि वाहक बचावले

Jalgaon: पिंपळगाव गोलाईतजवळ खाजगी बस जळून खाक: २५ प्रवाशांसह चालक आणि वाहक बचावले

जळगाव - पुणे ते  बऱ्हाणपूर- धारणी जाणारी  खाजगी बस  पिंपळगाव गाव गोलाईत ता.जामनेर जि.जळगाव येथे बसने पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. सुदैवाने यातील पंचवीस प्रवासी, चालक व वाहक  बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे.  जामनेर- पहूर रस्त्यावर हि घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास मंगळवारी घडली आहे.

प्राप्त माहिती नुसार एमपी ४८झेडपी ५५३३ क्रमांकाची खाजगी बस पुण्याहून बर्हाणपूर ते धारणी  जात होती. पहूर सोडल्यानंतर  पिंपळगाव गाव गोलाईत गावाच्या जवळ बसने अचानक पेट घेतला. ही बाब  बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड करून बस थांबवित सर्व प्रवासी बाहेर काढले. यादरम्यान हवा  मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले .आणि प्रवासी सुखरूप स्थळी हलवित असतानाच बस पूर्ण पणे जळून खाक झाली. बसमध्ये जवळपास पंचवीस प्रवासी असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.  मोठा अनर्थ याठिकाणी टळला आहे.

पोलीस आणि अग्निशमन दल दाखल
पिंपळगाव गोलाईत येथील पोलीस पाटील यांनी तातडीने माहिती पहूर पोलीसांना कळविताच पहूर पोलीस कर्मचारी सुभाष पाटील व आकाश देशमुख यांनी अग्निशमन  शेंदुर्णि व जामनेर येथील दलाला पाचारण केले. याठिकाणी शेंदुर्णि येथील अग्निशमन दलाचे शरद बारी, ईश्वर सोणवने,जहिर तडवी, तसेच जामनेर अग्निशमन दलाचे राजेंद्र सोनार, पवन शिंदे, प्रशांत सुतार, मयूर यांनी आगिवर नियंत्रण मिळविले. यादरम्यान पिंपळगाव गोलाईत येथील सौरभ राजपूत, हरिभाऊ राजपूत, सगर शिसोदे,दिपक राजपूत व आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी सागर पाटील व गावकरी  यांनी मोलाचे  मदत कार्य केले. 
बचावलेल्या प्रवाशांची नावं पुढील प्रमाणे
संतोष, सोलंकी रा.उडी,गंगाधर मांगीलाल वायफुले,अर्जुन नार्वे,दिलीप सोलंकी, संतोष डावर, जितेंद्र सोलंकी, आशा सावरकर, मुकेश डिकार,सुनील डावरे, भिलवलकर, ऋत्विक पारेकर,पुजा वासकुले,प्रमिला डावर, राजवंती डावर, सुनिता सोलंकी, भारती राठोड, सुनिता मोरले,चालक अजय चोपे व वाहक। दिपक सर्व राहणार बर्हाणपूर, धारणा, खंडवा, मोंद्रा,उडी येथील असल्याचे सांगितले आहे. उर्वरित प्रवासी भयभीत झाल्याने मिळेल त्या वाहनाने  जामनेर कडे रवाना झाले.
 
टायरच्या खालील बाजुस फुगा फुटल्याने टायरने पेट घेतला हि बाब बस मधील प्रवाशाच्या लक्षात आल्याने आम्ही सर्व तातडीने खाली उतरून सुरक्षित स्थळी गेलो.
- संतोष लकडिया सोलंकी (प्रवाशी)

Web Title: Jalgaon: Private bus burnt down near Pimpalgaon Golait: Driver and conductor along with 25 passengers survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.