शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पोलिसांनी १४ लाखाचा गुटखा पकडला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 22:43 IST

गुन्हा दाखल : सहायक पोलीस अधीक्षकांची कारवाई

जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या गुटख्याच्या गोदामावर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकाने सोमवारी रात्री ८ वाजता छापा टाकला. त्यात १३ लाख ६८ हजार १२० रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा मालक विजय मिश्रा याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

एमआयडीसीत एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना मिळाला होती. त्यानुसार डॉ.उगले यांनी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम व  पोलीस अधीक्षकांचे वाचक सिध्देश्वर आखेगावकर यांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या. या अधिकाºयांनाच कारवाईचे ठिकाण व स्वरुप माहिती होते, त्यामुळे सोबत असलेल्या पथकातील कोणालाच त्याची माहिती देण्यात आली नव्हती. पथकाला थेट गोदामावर नेण्यात आल्यावर कारवाई करण्यात आली. चौकशीत हे गोदाम व साठा विजय मिश्रा (रा.शाहू नगर) यांच्या मालकीचा असल्याची माहिती निरीक्षक बापू रोहोम यांनी दिली. या कारवाई पथकात सहायक फौजदार चंद्रकांत पाटील, रवींद्र घुगे, महेश महाजन, किरण चौधरी, दर्शन ढाकणे यांच्यासह सहायक पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील सहायक फौजदार विनयकुमार देसले, सुनील पाटील, अशोक फुसे, प्रवीण पाटील, जमील खान, रवींद्र पाटील, भूषण मांडोळे, आसिफ पिंजारी व भरत डोळे यांचा समावेश आहे.

गुटख्यातून कोट्यवधीची उलाढालसट्टा, दारु यासह गुटख्याची अवैध विक्री शहरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परराज्यातून कंटेनर भरुन गुटखा शहर व परिसरात आणला जात असून तेथून सकाळी ५ ते ७ या वेळेत लहान वाहनातून गुटखा किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहचविला जात आहे. या गुटख्याच्या साखळीत खाकीतील काही कर्मचाºयांचा सहभाग तर काहींचा आशिर्वाद असल्याचे उघड झाले होते.कोट्यवधीची उलाढाल करणाºया या माफियांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. दत्तात्रय शिंदे यांच्या काळातच माफियांचे गोदाम उदध्वस्त झाले होते. तेव्हा त्यांनी अवैध धंद्याशी संबंधित कर्मचाºयांना मुख्यालयात जमा केले होते. दरम्यान,आताही गोदामांची जागा वारंवार बदलविण्यात येत आहे. जळगाव शहर, पाळधी व नशिराबाद गुटख्याचे मुख्य केंद्र आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव