शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: भ्रष्ट संचालकांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘नो एण्ट्री’, कायद्यातील पळवाटांवर सहकार विभागाची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:46 IST

जळगाव: राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कारभाराचे आता कठोर मूल्यमापन होणार आहे.

सुनील पाटीललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव: राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कारभाराचे आता कठोर मूल्यमापन होणार आहे. वारंवार अर्थसाहाय्य देऊनही कारभार न सुधारणाऱ्या बँकांच्या संचालक मंडळांवर आणि प्रशासकांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार विभागाला दिले आहेत. भ्रष्ट आढळलेल्या संचालकांना आता कायद्याच्या पळवाटांचा आधार घेऊन पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरता येणार नाही, याची खबरदारी घेण्यासही सांगण्यात आले आहे.

वारंवार आर्थिक मदत करूनही सुधारणा नाही

वारंवार आर्थिक मदत करूनही कारभार न सुधारणाऱ्या बँकांना पुन्हा पुन्हा पैसा पुरवणे संयुक्तिक नाही, अशी तीव्र भूमिका वित्त व नियोजन विभागाने घेतली होती. जिल्हा बँका शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने त्या वाचवणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेत मंत्रिमंडळाने वित्त विभागाचा विरोध फेटाळून लावत मदतीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचवेळी जिल्हा बँकांच्या भ्रष्ट कारभारावर आणि कर्जवसुलीच्या ढिसाळपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

कठोर कारवाईची त्रिसूत्री

सर्व जिल्हा बँकांचे मूल्यमापन केवळ प्रशासक असलेल्याच नव्हे, तर सर्व जिल्हा बँकांच्या कारभाराची तपासणी होणार आहे. ज्या बँकांवर प्रशासक नेमले आहेत, त्यांच्याही कामाचे मूल्यमापन होणार. चुकीचे आढळून आल्यास प्रशासकांवरही कारवाई केली जाणार. राजकीय आश्रय घेऊन कायद्यातील पळवाटांचा वापर करणाऱ्या भ्रष्ट संचालकांना निवडणुकीतून कायमचे बाद करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. 

कर्ज वसुली का  होत नाही? 

अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत  शेतकरी पीककर्जाची परतफेड करत नसल्याने बँका अडचणीत येतात असा काही मंत्र्यांचा युक्तिवाद मुख्यंत्र्यांनी फेटाळून लावला. तसेच पिककर्जाचे सोडून द्या; अन्य कर्जवसुली का होत नाही? याचा अर्थ कारभारातच मोठे दोष आहेत. असे म्हणत  जिल्हा बँकेच्या कारभारावर नाराजी दर्शवली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalgaon Bank: Corrupt Directors Barred; Cooperative Department Eyes Loopholes

Web Summary : Corrupt directors face bans from Jalgaon District Central Bank elections. The cooperative department scrutinizes loopholes, addressing poor management despite financial aid. Stricter action is expected against failing banks and administrators, focusing on loan recovery.
टॅग्स :JalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्रbankबँक