जळगाव : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादी कार्यकर्ते ताब्यात
By आकाश नेवे | Updated: September 20, 2022 15:50 IST2022-09-20T15:49:48+5:302022-09-20T15:50:09+5:30
दौऱ्यात आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जळगाव : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादी कार्यकर्ते ताब्यात
जळगाव - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देऊन कार्यकर्ते आंदोलन करणार होते मात्र त्या आधीच त्यांना ताब्यात घेतले आहे.
जळगाव शहरात आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार शिंदे गट आणि भाजपा यांच्या कडून सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यकर्त्यांना नोटीस दिली होती आणि आंदोलन करण्याआधीच चौकात असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजरी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, रिकु चौधरी, सुनील माळी यांच्यासह ८ जणांना ताब्यात घेतले आहे.