जळगाव महापालिका निवडणूक : भाजपाने आचारसंहितेचा भंग केला : राष्ट्रवादीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 14:37 IST2018-07-19T14:34:51+5:302018-07-19T14:37:35+5:30
उत्तर राष्ट्रवादी विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मंजूर झाल्याबद्दल भाजपाने दिलेल्या जाहिरातीमध्ये पक्षांचे नेते व पक्षांचे चिन्ह जाणीवपूर्वक टाकले आहे. त्यामुळे भाजपाने आदर्श आचारसंहितेचा भंग केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला

जळगाव महापालिका निवडणूक : भाजपाने आचारसंहितेचा भंग केला : राष्ट्रवादीची तक्रार
जळगाव : उत्तर राष्ट्रवादी विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मंजूर झाल्याबद्दल भाजपाने दिलेल्या जाहिरातीमध्ये पक्षांचे नेते व पक्षांचे चिन्ह जाणीवपूर्वक टाकले आहे. त्यामुळे भाजपाने आदर्श आचारसंहितेचा भंग केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून, याबाबत बुधवारी मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत डांगे यांच्याकडे तक्रार केली आहे.
यावेळी संजय चव्हाण, कल्पिता पाटील, अरविंद मानकरी, रोहन सोनवणे, सोपान पाटील, गणेश निंबाळकर, मधुकर म्हस्के, चंद्रकांत चौधरी, राहुल जोशी आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारत राष्ट्रवादीने म्हटले आहे की, आचारसंहिता लागू असताना जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या शासकीय निवासस्थानात भाजपच्या अंतर्गत बैठका व उमेदवारांचे नियोजन होत आहे. तसेच शहरातील पेट्रोल पंप, बॅँकामध्ये महिलांना गॅस वितरण संबधीच्या जाहिराती लावल्याअसून यामध्ये भाजपच्या पक्षप्रमुखांचे फोटो असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी संबिधतांवर आचारसंहिता भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून करण्यात आली आहे.