स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव मनपा ६४ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:35+5:302021-02-05T05:52:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये देशातील ३८२ शहरांचा समावेश होता. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य ...

Jalgaon Municipal Corporation ranks 64th in clean survey | स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव मनपा ६४ व्या स्थानावर

स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव मनपा ६४ व्या स्थानावर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये देशातील ३८२ शहरांचा समावेश होता. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य आणि केंद्रीय समितीने डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० मध्ये पाहणी केली होती. याबाबतचा निकाल ऑगस्ट २०२० मध्ये जाहीर करण्यात आला होता. यामध्ये जळगाव मनपा देशातून ६४ व्या स्थानावर तर राज्यातील ३३ मनपातून २० व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ स्पर्धेत जळगाव शहराने स्वच्छतेचा बाबतीत देशभरात ७६ क्रमांक प्राप्त केला होता. २०२० मध्ये जळगाव मनपाने १२ स्थानांची झेप घेत ६४ वे स्थान पटकाविले आहे. मनपाने आता २०२१ साठी तयारी सुरू केली आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग स्पर्धेतही जळगाव मनपाला तीन स्टार देण्यात आले आहेत.

नाशिक, अहमदनगरसारख्या मोठ्या शहरांना केवळ एकच स्टार मिळाला आहे. दरम्यान, जळगाव मनपाने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत झेप घेतली असली तरी जळगाव मनपाकडून अजूनही कचऱ्यावर पूर्णपणे प्रक्रिया केली जात नसून, मनपाचा घनकचरा प्रकल्प गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे. हा प्रकल्प बंद असल्याने मनपाला स्टार रेटिंग व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ६०० गुणांचे नुकसान झाले. दरम्यान, घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला व सुक्या कचऱ्याचे संकलन नियमित होते.

Web Title: Jalgaon Municipal Corporation ranks 64th in clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.