शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

जळगाव महापालिकेसाठी भाजपाचा विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:15 IST

मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे आश्वासन दिले. त्यामुळे जळगावकरांनी शिवसेनेला नाकारले व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात प्रथमच हादरा दिला. याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्विकारुन भाजपाला भरघोस कौल देत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.

ठळक मुद्देभाजपाचा ऐतिहासिक विजयमहापालिका निवडणुकीत शिवसेनेला धक्काभाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे दिले आश्वासन

हितेंद्र काळुंखे ।जळगाव : मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे आश्वासन दिले. त्यामुळे जळगावकरांनी शिवसेनेला नाकारले व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात प्रथमच हादरा दिला. याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्विकारुन भाजपाला भरघोस कौल देत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.सुरेशदादा जैन यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी गमावल्यानंतर ही मनपा निवडणूक त्यांच्यासाठी राजकीय अस्तीत्वाची लढाई होती. तर गिरीश महाजन यांच्या भाजपाच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला झळाळी देणारी होती.सत्ताधाऱ्यांवरील नाराजीचा फायदामनपावर हुडको व इतर कर्जाचा डोंगर असल्याने उत्पन्नातील बहुतांश वाटा हा कर्ज फेडण्यातच जात होता. यामुळे विकास कामांसाठी पैसाच शिल्लक राहत नसल्याने गेल्या अनेक वर्षात विकास कामेच होवू शकली नाही. याचबरोबर मनपातील सत्ताधाºयांवर गैरव्यवहाराचा ठपका बसला. ही कारणे मतदारांमध्ये सत्ताधारी खाविआ (शिवसेना) बद्दल नाराजी निर्माण करणारी ठरली. या नाराज मतदारांना विकासाचे आश्वासन देत आपल्याकडे वळविण्यात भाजपाने यश मिळवले....अन्यथा मते मागणार नाहीकेंद्रात व राज्यात सत्ता असल्याने मनपाला कर्जकमुक्त करु, विकासासाठी २ महिन्यातच २०० कोटी आणू आदी आश्वासने महाजन यांनी मतदारांना दिली. ही आश्वासने १ वर्षात पूर्ण नाही झालीत तर विधानसभेत मत मागणार नाही, असे म्हणत आमदार सुरेश भोळे यांना कसोटीवर लावले होते. हाच मुद्दा मतदारांना अपील करणारा ठरला. फक्त विकास करु असे म्हटले असते तर मतदारांनी कदाचित विश्वास टाकला नसता...आता विश्वास सार्थ ठरवावानगरपालिका आणि मनपाच्या इतिहासात भाजपाला जळगावकरांनी प्रथमच मनपावर एकहाती सत्ता देवून विश्वास टाकला आहे. यामुळे भाजपाचा हा ऐतिहासिकच विजय ठरतो. विकास करु या आश्वासनावर विश्वास ठेवत मतदारांनी भाजपाला कौल दिला. यामुळे १ वर्षात विकास करुन दाखवू , एकदा संधी देवून बघा.... असे म्हणणारे महाजन यांना मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा लागणार आहे.आयात उमेदवारांचे मिळाले बळभाजपाने मनसे, शिवसेना तसेच राष्ट्रवादीतून अनेक प्रबळ उमेदवार आयात केले. याचाही लाभ भाजपाला झाला. स्वपक्षाच्या १५ पैकी १३ नगरसेवकांना उमेदवारी दिली तर आयात उमेदवारांवर मदार ठेवत खाविआचे ३, राष्ट्रवादीचे ६, मनसेचे महापौर ललित कोल्हे यांच्यासह ६ व १ जनक्रांतीचा अशा एकूण १६ आयात नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईकांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांना खेचण्यात भाजपाची राज्यातील ‘सत्ता’ हेच प्रभावी अस्त्र ठरले.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा