जळगाव महापालिकेसाठी मतदान, शिवसेना-भाजपामध्ये मुख्य लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 09:21 IST2018-08-01T09:17:52+5:302018-08-01T09:21:54+5:30
जळगाव मनपा निवडणुकीच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात आहेत.

जळगाव महापालिकेसाठी मतदान, शिवसेना-भाजपामध्ये मुख्य लढत
जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (बुधवारी) मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
जळगाव मनपा निवडणुकीच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 9 पक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र खरा मुकाबला हा भाजपा व शिवसेनेत असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. गेल्या 35 वर्षांपासून जळगाव मनपावर सुरेशदादा यांची एकहाती सत्ता आहे.
निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक मतदान यंत्रांसह चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.