जळगाव-मुंबई विमानसेवेचा ‘श्री गणेशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 13:03 IST2019-09-01T13:02:43+5:302019-09-01T13:03:30+5:30
५८ प्रवाशांना घेऊन हे पहिले विमान मुंबईकडे झेपावले.

जळगाव-मुंबई विमानसेवेचा ‘श्री गणेशा’
जळगाव : जळगाव ते मुंबई विमानसेवेला रविवार १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरुवात झाली असून रविवारी सकाळी ५८ प्रवाशांना घेऊन हे पहिले विमान मुंबईकडे झेपावले.
तत्पूर्वी सकाळी १०.३८ वाजता अहमदाबादहून ६२ प्रवाशांना घेऊन हे विमान जळगावला पोहचले. या वेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले हे उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी प्रवाशांचे स्वागत केले.
हैदराबाद येथील ट्रू जेट या कंपनीतर्फे अहमदाबाद ते जळगाव, जळगावहून मुंबई व पुन्हा मुंबईहून कोल्हापूर अशी सेवा दिली जाणार आहे. जळगाव ते अहमदाबादचे तिकीट १ हजार ९९ रुपये आहे. तर मुंबईचे तिकीट १ हजार २९९ रुपये असेल. ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानाद्वारे ही सेवा असेल.
मुंबईहून दुपारी ४.३० वा. विमान निघेल. जळगावला ते सायंकाळी ५.४० वाजता येईल. ६.५ वाजता अहमदाबादला रवाना होणार आहे.