अपघातात जळगावचे आमदार सुरेश भोळे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 12:36 IST2019-09-12T12:31:10+5:302019-09-12T12:36:43+5:30
गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रिंगरोडवर हा अपघात झाला.

अपघातात जळगावचे आमदार सुरेश भोळे जखमी
जळगाव - बहिणाबाई उद्यानाकडून घराकडे जात असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकीपासून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात आमदार सुरेश भोळे जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रिंगरोडवर घडली.
बरगडिला मुका मार लागला असून आता डॉ. नहाटा यांच्याकड़े उपचारासाठी दाखल केल्याची माहिती महापालिका स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी दिली.