Jalgaon LCB inspector Bapu Rohom's transfer was finally canceled | जळगाव एलसीबीचे निरीक्षक बापू रोहोम यांची बदली अखेर रद्द
जळगाव एलसीबीचे निरीक्षक बापू रोहोम यांची बदली अखेर रद्द

ठळक मुद्देरविवारी बदली आदेश स्थगितमुंबईत महासंचालक कार्यालयात संलग्न होते.


जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची मुंबई येथे पोलीस महासंचालक कार्यालयातील निवडणूक कक्षात झालेली बदली रविवारी सायंकाळी रद्द झाली आहे. दोन दिवसापूर्वीच रोहोम यांना मुंबईत महासंचालक कार्यालयात संलग्न करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी त्यांना तातडीने कार्यमुक्तही करण्यात आले होते.
मविप्र प्रकरणात अ‍ॅड.विजय भास्कर पाटील व सहका-यांना झालेली अटक रोहोम यांना भोवली होती. रोहोम यांच्याबाबतीत कोणतीही तक्रार किंवा कार्यकाळही पूर्ण झालेला नव्हता. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करुन रोहोम यांनी अ‍ॅड.पाटील यांना अटक केली होती, दुसरीकडे न्यायालयानेही अटकेबाबत जाब विचारला होता. या अटकसत्रामुळे दोन दिवस मोठ्या घडामोडी घडल्या. रोहोम यांना या गुन्ह्याचे कागदपत्रे घेऊन मुंबईत पाचारण करण्यात आले होते. रविवारी बदली आदेश स्थगित करण्यात आले. सोमवारी आपण पदभार घेऊ असे रोहोम यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.


Web Title: Jalgaon LCB inspector Bapu Rohom's transfer was finally canceled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.