Jalgaon: जळगावातील उद्योजक अशोक जैन यांना अयोध्येचे निमंत्रण

By विलास बारी | Updated: January 17, 2024 00:08 IST2024-01-17T00:07:42+5:302024-01-17T00:08:15+5:30

Jalgaon News: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने दि.२२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असून, या सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

Jalgaon: Jalgaon entrepreneur Ashok Jain invited to Ayodhya | Jalgaon: जळगावातील उद्योजक अशोक जैन यांना अयोध्येचे निमंत्रण

Jalgaon: जळगावातील उद्योजक अशोक जैन यांना अयोध्येचे निमंत्रण

- विलास बारी
जळगाव - श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने दि.२२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असून, या सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह कार्यवाह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी हे आमंत्रण अशोक जैन यांना प्रदान केले. यावेळी अतुल जैन उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने २२ जानेवारीच्या सोहळ्याचे निमंत्रण मला मिळाले ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. श्रीराम मंदिर निधी जळगाव जिल्हा समर्पण समितीचा कार्याध्यक्ष नात्याने पवित्र अशा या धार्मिक कार्यात माझा सहभाग होताच. जिल्ह्यातील ५० लाख श्रीराम भक्तांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला यानिमित्ताने मिळते आहे हीसुद्धा भूषणावह बाब असल्याचे अशोक जैन यांनी सांगितले.

Web Title: Jalgaon: Jalgaon entrepreneur Ashok Jain invited to Ayodhya