- गोपाल व्यास बोदवड (जि.जळगाव) - भांड्याचे व्यापारी कासार बंधू यांच्या बंद घराला अचानक आग लागली. यात हजारो रुपयांची भांडी जळून खाक झाली. ही घटना शहरातील शिवद्वारजवळ गुरुवारी पहाटे चार वाजता घडली. आग लागल्यानंतर या बंद घरात ठेवलेले फटाके फुटले. त्या आवाजाने शेजारील लोक जागे झाले. त्यांनी लागलीच आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आगीवर नियंत्रण मिळवितांना बाळू शर्मा यांच्या पाठीत सळई घूसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
Jalgaon: बोदवड येथे बंद घराला आग, हजारो रुपयांची भांडी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 10:04 IST