‘रेडक्रॉस’ सुरू करणार जळगावात रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:32 IST2018-11-02T15:31:06+5:302018-11-02T15:32:53+5:30

पिंप्राळा परिसरात बांधकाम करून मिळणाºया ठिकाणी गरजू रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करून त्याची सर्व जबाबदारी रेडक्रॉस संस्था घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Jalgaon Hospital will launch 'Red Cross' | ‘रेडक्रॉस’ सुरू करणार जळगावात रुग्णालय

‘रेडक्रॉस’ सुरू करणार जळगावात रुग्णालय

ठळक मुद्देपिंप्राळा परिसरात बांधकाम करून मिळणाऱ्या ठिकाणी रुग्णालयइंडियन रेडक्रॉस सोसायटीची वार्षिक सर्व साधारण सभारेडक्रॉसला जागा देणाºया कुटुंबाचा सत्कार

जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण उत्साहात झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन पिंप्राळा परिसरात बांधकाम करून मिळणाºया ठिकाणी गरजू रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करून त्याची सर्व जबाबदारी रेडक्रॉस संस्था घेणार असल्याचे सांगण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, कोषाध्यक्ष सतीश चरखा, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहकोषाध्यक्ष जी.टी. महाजन, कार्यकारिणी सदस्य डॉ. विजय चौधरी, प्रा. शेखर सोनाळकर, पुष्पा भंडारी, अ‍ॅड. हेमंत मुदलीयार उपस्थित होते. सभेचे इतिवृत्त विनोद बियाणी यांनी वाचून दाखविले. रक्तदाते डॉ.सतीश चित्रे, नीळकंठ गायकवाड, विजय रामदास पाटील, धनंजय जकातदार, मुकुंद गोसावी, डॉ. जे.बी. राजपूत, अ‍ॅड मंजुळा मुंदडा उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश यावलकर यांनी केले तर डॉ. रेखा महाजन यांनी आभार मानले.
जागा देणाºयांचा सत्कार
शालिग्राम नवलराम पाटील व जिजाबाई शालिग्राम पाटील यांनी रेडक्रॉसला पिंप्राळा परिसरातील त्यांच्या मालकीची जागा स्व:खर्चाने बांधकाम करून देणगी स्वरूपात देणार आहेत. या जागी गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असून याची सर्व जबाबदारी रेडक्रॉस संस्था घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सत्कार्यासाठी किशोर राजे निंबाळकर यांनी शालिग्राम पाटील यांचा सहकुटुंब सत्कार केला.

Web Title: Jalgaon Hospital will launch 'Red Cross'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.