जळगावलाही फटका; केळी, मक्यासह रब्बी पीक भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:56 IST2018-02-12T00:56:21+5:302018-02-12T00:56:48+5:30
जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी गारपीट होऊ मोठे नुकसान झाले़ अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांसह केळीलादेखील फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.

जळगावलाही फटका; केळी, मक्यासह रब्बी पीक भुईसपाट
अजय पाटील
जळगाव : जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी गारपीट होऊ मोठे नुकसान झाले़ अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांसह केळीलादेखील फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.
जळगाव तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये पाऊस झाला आणि वाºयासह गारपीट झाली. त्यात गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले असून,
केळीच्या कांदेबागालादेखील फटका बसला आहे. कठोरा भागात अनेक ठिकाणी वाºयामुळे केळीचे खांब कोसळले. हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल
झाले आहेत.
जामनेर तालुक्यातील अनेक भागात रविवारी दुपारी गारपीट झाली. मोठ्या गारांचा वर्षाव १५ मिनिटापर्यंत सुरूच होता. त्यामुळे गहू, हरबरा भुईसपाट झाला़ केळीची पाने फाटून कापणीस आलेल्या केळीच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. आधीच कापसाच्या पिकावरील बोंड अळीच्या प्रादूर्भावाने शेतकरी नागवला गेला आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी कपाशी उपटून गहू, हरबरा पेरला होता.
अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकºयांसोबत जाऊन पाहणी केली व अधिकाºयांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे़ नुकसानग्रस्तांना तातडीने शासनाकडून मदत देण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.