पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतले सप्तश्रृंगी देवीचे दर्शन!
By विलास.बारी | Updated: October 3, 2022 18:54 IST2022-10-03T18:53:44+5:302022-10-03T18:54:13+5:30
देवीच्या पाया पडून दसरा मेळाव्यासाठी मुंबईला रवाना

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतले सप्तश्रृंगी देवीचे दर्शन!
जळगाव: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, तथा शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी दुपारी वणी (जि.नाशिक) येथे सप्तश्रृंगी गडावर जावून देवीचे दर्शन व महाआरती केली. यावेळी त्यांनी देवीचे आर्शिवाद घेवून मुंबईला दसऱ्या मेळाव्याला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित दसरा मेळावा मुंबईत होणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्हयातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते जाणार आहे. काही कार्यकर्ते आज विविध प्रकारच्या वाहनांनी रवाना झाले आहे. त्यांनीही सप्तश्रृंगी गडावर देवीचे दर्शन घेतले. ते नाशिक व गडावर आज मुक्काम करून नंतर मुंबईला जाणार आहे. तर काही कार्यकर्ते ४ तारखेला जळगाववरून वाहनांनी जाणार आहे. अनेक चारचाकी वाहने, खासगी बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.