शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जळगावात जिल्हा रुग्णालयात काम बंद, कर्मचाऱ्याच्या विक्षीप्तपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:55 PM

चौकशी समिती गठीत

ठळक मुद्देमहिला परिचारिकेला जातीवाचक संदेशअहवाल सादर करण्याचे आदेश

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 - महिला परिचारिकांशी अश्लिल व लज्जा वाटेल असे वर्तन करणे, अर्वाच्च भाषा वापरणे, दादागिरी करणे व गुन्हेगारी वृत्तीने वागणाºया रवींद्र देवराम पवार या कर्मचाºयाच्याविरोधात जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिकांनी एल्गार पुकारला आहे. या कर्मचाºयाची बदली होत नाही, तोपर्यंत काम न करण्याचा पवित्रा घेऊन या सर्व कर्मचाºयांनी सोमवाारी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रारी केल्या.याबाबत परिचारिकांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र पवार हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी (शिपाई) आहे. त्याच्याकडे वर्ग-३ च्या कर्मचाºयाचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील परिचारिकांकडून तो बिलाची वसूली करतो. हे बील त्याने वॉर्डात जाऊन घेणे अपेक्षित आहे. संपूर्ण महाराष्टÑात हीच पध्दत असताना येथे मात्र त्याला छेद देण्यात आला आहे. पवार हा गुन्हेगारी वृत्तीचा असून माझे कोणीच काही करु शकत नाही असे सांगून तो महिला कर्मचाºयांशी अरेरावी करतो, अशी तक्रार सार्वजनिक परिचारिका संघटनेच्या राज्य कोषाध्यक्ष सुरेखा लष्करे व सविता अग्नीहोत्री यांनी केली आहे. या कर्मचाºयावर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रारी करुनही प्रशासन त्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप परिचारिकांनी केला.महिला परिचारिकेला जातीवाचक संदेशसविता अग्निहोत्री या महिला परिचारिकेला पवार याने जातीवाचक संदेश पाठविला आहे. याआधी देखील त्यांने विकृतपणा केला, मात्र त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले होते. आता मात्र त्याने परिसिमा ओलांडली आहे. पवार याच्याविरुध्द सुरेखा लष्करे, सविता अग्निहोत्री, छाया पाटील, जे.एम.बागुल, एन.एस.बालोद, रेखा धनगर, मालु वानखेडे, राणी बोराडे, आशा सिखलकर व आशा बारेला यांनी तक्रार केली आहे.बारेला यांनी तर ४ आॅक्टोबर २०१७ रोजी पोलीस उपअधीक्षक व २० जानेवारी २०१८ रोजी अधीष्ठाता यांच्याकडे तक्रार केली आहे. लष्करे यांनीही ९ फेब्रुवारी २०१८ रोजी तर ६७ शिपायांनी पवार याचे मुकादम पद रद्द करण्याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली आहे.रवींद्र पवारची मुळ पदावर नियुक्ती; चौकशीसाठी समिती गठीतरवींद्र पवार या कर्मचाºयावर कारवाईसाठी परिचारिकांनी घेतलेला आक्रमक पवित्रा व हिंदूत्ववादी संघटना देखील परिचारिकांच्या बाजूने उभ्या राहिल्याने वैद्यकिय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी तातडीने पवार याची मुळ शिपाई पदावर नियुक्ती केली. दरम्यान, प्रभारी अधिसेविका सविता अग्निहोत्री यांच्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधीक्षक डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. चौकशी करुन २२ तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ.खैरे यांनी दिले आहेत. या समितीत डॉ.योगिता बाविस्कर व डॉ.निलेश देवराज यांचा समावेश आहे.पवार याच्या विक्षिप्तपणाला महिला परिचारिका कंटाळल्या आहेत. महिलांशी अर्वाच्च भाषा व लज्जा वाटेल असे कृत्य त्याच्याकडून केले जाते. गुन्हेगारी वृत्तीच्या माणसाकडे आर्थिक व्यवहार देता येत नाही, तरीही प्रशासनाने त्याच्यावर जबाबदारी सोपविली आहे. प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे.-सुरेखा लष्करे, राज्य कोषाध्यक्ष, सार्वजनिक परिचारिका संघटना

टॅग्स :JalgaonजळगावHealthआरोग्य