जळगाव जि. प. च्या कामगिरीची नंदुरबारच्या पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 19:48 IST2018-02-15T19:46:38+5:302018-02-15T19:48:40+5:30
यशवंत पंचायतराजबाबत आत राज्याच्या समितीबाबत उत्सुकता

जळगाव जि. प. च्या कामगिरीची नंदुरबारच्या पथकाकडून पाहणी
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१५ : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये झालेल्या कामगिरीची पाहणी नंदुरबार येथील पथकाने जळगाव जिल्हा परिषदेला १५ रोजी भेट देवून केली. या पाहणीचा अहवाल राज्याच्या ग्रामविकास विभागाला पाठविण्यात येणार आहे. या कामगिरीबाबत अहवालानुसार चांगले गुण मिळाल्यास राज्यस्तरीय पुरस्काराच्या दृष्टीने राज्याची समिती येवून कामगिरीची पाहणी करेल. यामुळे पुढे काय? याबाबत आता उत्सुकता लागून आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन व अन्य दोन अधिकारी अशा तीन जणांच्या पथकाने गुरुवारी दुपारी ११ वाजेपासून दिवसभर विविध विभागांच्या कामगिरीचा आढावा घेतला. पथक येणार असल्याने जि.प.मध्ये गेल्या आठवड्यापासूनच तयारी सुरु होती.