जळगाव जिल्हा दूध संघातील अपहार, फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याने न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:46 IST2018-03-17T22:46:18+5:302018-03-17T22:46:18+5:30
जिल्हा दूध संघातील अपहार, फसवणूक व गुन्हेगारीकृत्याबाबत पोलिसांकडे तक्रार करुनही गुन्हे दाखल केली जात नसल्याने तक्रारदार एन.जे. पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

जळगाव जिल्हा दूध संघातील अपहार, फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याने न्यायालयात धाव
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१७ : जिल्हा दूध संघातील अपहार, फसवणूक व गुन्हेगारीकृत्याबाबत पोलिसांकडे तक्रार करुनही गुन्हे दाखल केली जात नसल्याने तक्रारदार एन.जे. पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी कांबळे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले असून त्यावर १२ एप्रिल रोजी पडताळणी होणार असल्याची माहिती एन.जे. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री एकनाथराव खडसे, दुग्ध खात्याचे तत्कालिन सचिव महेश पाठक, सहकारी संस्थेचे सहनिबंधक एस.एस.आमने, नाशिक येथील सहकारी संस्थेचे (दुग्ध) विभागीय निबंधक डॉ.मेधा वाके, एनडीडीबीचे चेअरमन टी.नंदकुमार, एनडीडीबीचे कार्यकारी संचालक दिलीप रथ, जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, लेखा व्यवस्थापक काशिनाथ पाटील, वैधानिक लेखा परिक्षक गायकवाड अॅँड शहा, अंतर्गत लेखा परिक्षक प्रधान फडके अॅँड कंपनी, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, विद्यमान पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्याविरुध्द पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.