जळगाव जिल्हा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:34 IST2019-03-19T15:33:13+5:302019-03-19T15:34:26+5:30
गोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : जळगाव जिल्हा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना जाहीर करण्यात आली. त्यात ...

जळगाव जिल्हा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची कार्यकारिणी जाहीर
गोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : जळगाव जिल्हा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना जाहीर करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी चाळीसगावचे दत्तात्रय भिला मालपुरे यांची सर्वानुुमते निवड करण्यात आली.
ही निवड संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर , प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे, राष्ट्रीय संघटक दीपक येवले यांनी केली आहे. राज्य कार्यकारिणी अशी- प्रदेशाध्यक्ष नंदलाल धांडे (नाशिक), निवड समिती (राज्य प्रतिनिधी) गिरीष रामचंद्र वाणी, प्रदेश खजिनदार पारोळा, बापूराव लक्ष्मण वाकलकर, कार्यकारिणी सदस्य जळगाव, विजय पुंडलीक पाखले, चाळीसगाव, स्वप्नील भोकरे, जळगाव, किशोर शिरोडे, चाळीसगाव. याशिवाय जळगाव जिल्हा कार्यकारणी अशी- जिल्हाध्यक्ष डी. बी. मालपुरे, चाळीसगाव, उपाध्यक्ष अजय पांडुरंग कोतकर, चाळीसगाव, कार्याध्यक्ष- शशिकांत महालपुरे, पाचोरा, कोषाध्यक्ष- सी.सी.वाणी, चाळीसगाव, खजिनदार- पी.के.सोनजे, पारोळा, उपाध्यक्ष- नीलेश दुसे, मुख्य संघटक - दीपक शिनकर, पारोळा, संघटक - चंद्रशेखर वाणी, धरणगाव, संघटक सुनील पंढरीनाथ वाणी, अमळनेर, संघटक- नितीन मेणे एरंडोल, संघटक अमोल येवले, चाळीसगाव, महिला प्रतिनिधी नीलिमा निंबा दशपुते, पारोळा, स्वाती प्रभाकर मोराणकर, भडगाव.
एकसंघ राहण्यासाठी प्रयत्नरत असणार असल्याचे कार्यकारिणीने म्हटले आहे.