शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दरवाजा उघडला अन् दिसला पत्नी व मुलीचा मृतदेह; जळगावातील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 20:28 IST

कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी गेले असताना टोकाचा निर्णय

Crime News: घरी कोणीही नसताना पोटच्या मुलीला गळफास देत सोनाली दीपक दाभाडे (३६, रा. व्यंकटेशनगर) या महिलेने स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २४) दुपारी व्यंकटेशनगरमध्ये घडली. दुपारी महिलेचे पती दीपक दाभाडे हे घरी परतले व दरवाजा उघडताच त्यांना पत्नी व मुलगी तेजस्विनी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. 

हरिविठ्ठलनगर परिसरातील व्यंकटेशनगरमध्ये दीपक दाभाडे हे तिसऱ्या मजल्यावर राहतात. भुसावळ येथे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने रविवारी सकाळी ते आपल्या दोन भावांसह गेले होते. त्यावेळी घरी दीपक यांच्या पत्नी सोनाली व मुलगी तेजस्विनी होती.

घरात कोणीही नसताना सोनाली यांनी आठ वर्षीय मुलीला छताच्या पंख्याला दोरीने गळफास दिला व स्वतः देखील दुसऱ्या दोरीने गळफास घेतला.

माहेरच्या मंडळींचा आक्रोश

सोनाली यांचे मालेगाव येथील माहेर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या माहेरची मंडळी संध्याकाळी जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचले. यावेळी त्यांनी मोठा आक्रोश केला.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस