आरटीओ अधिका-यांशी अरेरावी करणारा कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:23 IST2020-08-25T20:23:16+5:302020-08-25T20:23:33+5:30
जळगाव : आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सहायक मोटार वाहन निरीक्षकांशी अरेरावी व शिवीगाळ करणाºया मयुर श्याम जोशी (रा.पहूर कसबे, ...

आरटीओ अधिका-यांशी अरेरावी करणारा कारागृहात
जळगाव : आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सहायक मोटार वाहन निरीक्षकांशी अरेरावी व शिवीगाळ करणाºया मयुर श्याम जोशी (रा.पहूर कसबे, ता.जामनेर) याला याची मंगळवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता जोशी याने महिला अधिकारी व इतर मोटार वाहन निरीक्षकांशी हुज्जत घातली होती. याप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षक पांडूरंग बबन आव्हाड (रा.श्रध्दा कॉलनी) यांच्या फिर्यादीवरुन जोशी याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संध्याकाळी त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी न्या.शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी पाच दिवसाची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. सरकारतर्फे अॅड.स्वाती निकम तर संशयितातर्फे अॅड.कुणाल पवार यांनी कामकाज पाहिले.