शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
2
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
3
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
4
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
5
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
6
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
7
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
8
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
9
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
10
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
11
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
12
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
13
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
14
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
15
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
16
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
17
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
19
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
20
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

जळगाव मतदारसंघ तर भाजपाचा बालेकिल्ला - भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 3:37 PM

विकासात्मक भूमिकेमुळे जनतेचे पाठबळ कायम

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. स्व. उत्तमराव पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघाचा विकास भाजपाने केला असून जनतेचा भाजपावर पूर्ण विश्वास असल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका आणि जळगाव मतदारसंघातील एक प्रबळ दावेवार असलेल्या उदय वाघ यांच्याशी ‘लोकमत’ने ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमात संवाद साधला. त्यावेळी वाघ यांनी मनमोकळी चर्चा केली.प्रश्न : पण तुम्ही स्वत: इच्छा व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्याचे काय?वाघ : विषय तसा नव्हता. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे अमळनेरला आले असताना त्यांनी पुढील उमेदवार हे ए.टी.पाटील असतील, असे जाहीर केले होते. त्यानंतर मला काही पत्रकारांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रश्न विचारला असता मी भाजपामध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया असते. एकापेक्षा अनेक इच्छुक असतात. मलाही वाटते की, मी लोकसभा निवडणूक लढवावी. तसे अनेकांना वाटू शकते. पक्षाची केंद्रीय संसदीय समिती या सगळ्यांच्या मुलाखती घेते, उमेदवाराचे मूल्यांकन करते आणि नंतर उमेदवार निश्चित होतो, असे स्पष्टीकरण दिले होते.प्रश्न : पक्षाने तुमच्याकडे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली, हा तुमच्या संघटनात्मक गुणांचा गौरव म्हणावा लागेल?वाघ : मी मघाशी म्हटले की, मी निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी संपूर्ण क्षमतेने पार पाडत आलो आहे. पक्ष केंद्र व राज्यात सत्तेत असताना मला जिल्हाध्यक्षपदी मुदतवाढ मिळाली, याचा मला खूप आनंद झाला. माझ्या सर्व पदाधिकारी आणि सहकाºयांच्या प्रयत्न आणि कष्टामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपा थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षी झालेल्या ४९८ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने ३७२ ठिकाणी लोकनियुक्त सरपंचपद मिळविले. सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर भाजपाने चांगले यश मिळविले आहे.प्रश्न : पाच वर्षातील भाजपा सरकारची जिल्ह्याच्या दृष्टीने उपलब्धी काय सांगाल ?वाघ : जलसंपदा विभागाची मोठी कामे या काळात झालेली आहे. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी होत्या. पर्यावरण विभाग, जलआयोगाच्या मंजुरी बाकी होत्या. आता सगळे अडथळे दूर झाले आहेत. नाबार्डच्या निधीतून या धरणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. गिरणा नदीवरील बलून बंधाºयांना मान्यता मिळाली आहे. नार-पार योजनेसाठी निधी देण्याचे केंद्र सरकारने मान्य केल्याने गुजरातमध्ये जाणारे पाणी गिरणा नदीत वळवता येणार आहे. ग्रामीण रस्ते ते महामार्ग, नव्या रेल्वे गाड्या, विमानसेवा अशा दळणवळणाच्या साधनांमध्ये सुधारणा झाली आहे. त्याचा परिणाम नवे उद्योग येण्यात आणि रोजगार वाढण्यात निश्चित होईल.प्रश्न : लोकसभा निवडणूक लढविण्यास तुम्ही इच्छुक आहात काय?वाघ : मी भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडत आलो आहे. भाजपामधील कार्यकर्ता हा कोºया पाकिटासारखा असतो. पक्ष पाकिटावर जबाबदारी लिहितो आणि कार्यकर्ता ती प्रामाणिकपणे निभावतो. ही भाजपामधील कार्यसंस्कृती आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव