दुपारी बारा वाजेपर्यंत जळगाव मतदार संघात २१ तर रावेर मतदार संघात २२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:46 PM2019-04-23T12:46:00+5:302019-04-23T12:47:13+5:30

मतदारांचा उत्साह

In the Jalgaon constituency 21 percent voting | दुपारी बारा वाजेपर्यंत जळगाव मतदार संघात २१ तर रावेर मतदार संघात २२ टक्के मतदान

दुपारी बारा वाजेपर्यंत जळगाव मतदार संघात २१ तर रावेर मतदार संघात २२ टक्के मतदान

Next

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत असून काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत जळगाव मतदार संघात २१ टक्के तर रावेर मतदार संघात २२ टक्के मतदान झाले.
मतदान केंद्रात जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी मतदान केंद्राबाहेर मतदार स्लीप घेण्यासाठी आहे. जळगाव येथील विद्या इंग्लिश स्कूलमध्ये मोठीच रांग पहायला मिळाली.
वावडदा ता. जळगाव येथे मतदान केंद्र क्र.३०१ वर ईव्हीएम यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान उशिरा सुरु झाले. पिंप्राळा परिसरातील मनपा उर्दू शाळा क्र. ३५ वर मतदानासाठी गर्दी उडाली आहे. सकाळी दोन यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. ही यंत्रे लागलीच दुरुस्त करण्यात आली.

Web Title: In the Jalgaon constituency 21 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.