जळगाव शहरात दुचाकीच्या अपघातातील तरुणाला डंपरने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 16:34 IST2018-03-21T16:34:14+5:302018-03-21T16:34:14+5:30
दोन दुचाकीच्या धडकेत जमिनीवर कोसळलेल्या बरकत मुस्ताक पाशा (वय,३० रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणा-या डंपरने उडविल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता रामानंद नगरातील म्युनिसिपल कॉलनीजवळ घडली. या अपघात तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर पसार झालेल्या डंपरला नागरिकांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.

जळगाव शहरात दुचाकीच्या अपघातातील तरुणाला डंपरने उडविले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २१ : दोन दुचाकीच्या धडकेत जमिनीवर कोसळलेल्या बरकत मुस्ताक पाशा (वय,३० रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणा-या डंपरने उडविल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता रामानंद नगरातील म्युनिसिपल कॉलनीजवळ घडली. या अपघात तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर पसार झालेल्या डंपरला नागरिकांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बरकत मुस्ताक पाशा हा तरुण बुधवारी हरीविठ्ठल नगरात पीओपीच्या कामासाठी जवळचे नातेवाईक बबलु पाशा यांची दुचाकी (क्र.एम.एच १९ बी.डब्ल्यू २२६९) घेवून जात असताना रामानंद नगरजवळील म्युनिसिपल कॉलनीजवळ मागून येणा-या दुचाकीने (क्र.एम.एच. १९ ए.आर ५७५०) पाशा याच्या दुचाकीला धडक दिल्याने बरकत पाशा रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी गिरणा पंपींगकडे भरधाव वेगाने जाणाºया डंपरने (क्र.एम.एच.१९ झेड ६५६५) पाशा याला धडक दिली. त्यात डंपरच्या पुढील चाकाखाली आल्याने पाशा याच्या तोंडाला, उजव्या पायाला, उजव्या हाताला तर पोटाला गंभीर दुखापत झाली. अपघात होताच पाशा याला लोकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
डंपर चालकाचा पळण्याचा प्रयत्न फसला
अपघात झाल्यानंतर डंपर चालकाने तेथून लागलीच पळ काढला. घटनास्थळावर थांबलेल्या लोकांनी या डंपरचा पाठलाग केला. रामानंद नगरच्या उतारवरील दत्त मंदिराजवळ डंपर पकडण्यात आले. डंपर चालक आकाश हिरामण सपकाळे (वय २२) याला जागेवरच लोकांनी चोप दिला. त्यानंतर डंपरसह त्याला रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. डंपर हे शहरातील संजय ढेकळे यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.