जळगाव शहरात भररस्त्यावर तरुणाने पेट्रोल टाकून स्वत:ला पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 13:52 IST2018-06-11T13:52:08+5:302018-06-11T13:52:08+5:30
अविवाहितपणा, व्यवसायात अपयश येत असल्याने हेमंत प्रभाकर गोपनारायण (वय ३८, रा.श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) या तरुणाने स्वत:च्या हाताने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपासमोरील आदर्श हॉटेल नजीकच्या पटांगणात घडली.

जळगाव शहरात भररस्त्यावर तरुणाने पेट्रोल टाकून स्वत:ला पेटविले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,११ : अविवाहितपणा, व्यवसायात अपयश येत असल्याने हेमंत प्रभाकर गोपनारायण (वय ३८, रा.श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) या तरुणाने स्वत:च्या हाताने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपासमोरील आदर्श हॉटेल नजीकच्या पटांगणात घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता हेमंत याने घराच्या परिसरातच मोकळ्या पटांगणात अंगावर पेट्रोल टाकून पेटविले. रस्त्यावर तरुण जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे शिवाजी माळी, सुनील निकम, संजय पाटील, मनोरे यांच्यासह रहिवाशी शक्ती महाजन, स्वप्नील नेमाडे, राहूल पाटील व विक्की देवराज या तरुणांनी धाव घेऊन घरातील गोधळी तसेच वाळू टाकून हेमंत याला विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मालवाहू रिक्षातून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत हेमंत हा ८१ टक्के जळाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सुपे यांनी दिली.
व्यवसायात आले अपयश
हेमंत हा देश, विदेशात साखर, कापूस व कांदा आदी पिके समुद्रामार्गे निर्यात करायचा. काही दिवस हा व्यवसाय सुरळीत चालला. त्यानंतर त्यात अपयश आले.तीन महिन्यापासून तो तणावात राहत होता. वडील प्रभाकर गोपनारायण दूरसंचार विभागात नोकरीला होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. हेमंत हा मोठा आहे. एक भाऊ घरीच असतो तर सर्वात लहान हा बडोदा येथे कंपनीत नोकरीला आहे.