जळगाव शहरात तरुणाचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 12:23 IST2019-12-19T12:22:53+5:302019-12-19T12:23:30+5:30

घटना गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली

In Jalgaon city, a young man was stabbed to death with a knife | जळगाव शहरात तरुणाचा चाकूने भोसकून खून

जळगाव शहरात तरुणाचा चाकूने भोसकून खून

जळगाव : शहरात प्रशांत सिद्धेश्वर गंजाळे (३५ रा. शाहू नगर) या तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. युवराज हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या जेएमपी मार्केटमध्ये जैन ग्लोबल एंटरप्रायजेस या दुकानाच्या ओट्याला लागून रक्तबंबाळ अवस्थेत तरुण आढळून आला. कोंबडी मार्केटजवळील दिशा एंटरप्रायजेस या दुकानाच्या समोर अंडापावच्या गाडीवर रात्री वाद झाला होता. तेथेच प्रशांतच्या छातीत चाकूने वार झाले. तेथून जीव वाचवण्यासाठी तो तशाच अवस्थेत धावत सुटला. रस्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग पडले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण निकम, सहायक निरीक्षक गणेश बुवा दाखल झाले आहेत. कारण व मारेकरी अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

Web Title: In Jalgaon city, a young man was stabbed to death with a knife

टॅग्स :Jalgaonजळगाव