जळगाव शहरात बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:07 IST2019-06-11T22:04:55+5:302019-06-11T22:07:28+5:30
कामानिमित्त शहरात आलेल्या एकाने घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षाच्या बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सायंकाळी नेरी नाका परिसरात उघडकीस आली. युवराज कडू होंडाळे (३६, रा. विचवे, ता.बोदवड) असे संशयिताचे नाव असून नागरीकांनी त्यास चोप देवून शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.

जळगाव शहरात बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न
जळगाव : कामानिमित्त शहरात आलेल्या एकाने घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षाच्या बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सायंकाळी नेरी नाका परिसरात उघडकीस आली. युवराज कडू होंडाळे (३६, रा. विचवे, ता.बोदवड) असे संशयिताचे नाव असून नागरीकांनी त्यास चोप देवून शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज कडू होंडाळे हा कामाचे पैसे घेण्यासाठी मंगळवारी नेरी नाक्याजवळील लक्झरी स्थानकावर सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास आला होता. त्यावेळी त्याच ठिकाणी राहणाºया चार वर्षीय चिमुकलीला एकटी पाहून तिला उचलून शेजारीच असलेल्या लक्झरी बसमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब बालिकेच्या लहान भावाला लक्षात आल्यानंतर त्याने हा प्रकार आईवडीलांना सांगितला. त्यांनी तातडीने बालिकेचा शोध घेतला. त्यावेळी संशयित युवराज होंडाळे हा लपून बसला होता. बालिकेला ताब्यात घेवून नागरीकांनी त्यास चोपून पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.