Jalgaon: बहिणाबाई महोत्सवाचे श्रीराम मंदिर, शिवराज्याभिषेक सोहळा यंदाचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 22:39 IST2024-01-18T22:39:06+5:302024-01-18T22:39:23+5:30
Jalgaon News: बहिणाबाई महोत्सवाचे २५ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर स्थापना उत्सव तसेच ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण राहणार असल्याची माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषद सांगितले.

Jalgaon: बहिणाबाई महोत्सवाचे श्रीराम मंदिर, शिवराज्याभिषेक सोहळा यंदाचे आकर्षण
- भूषण श्रीखंडे
जळगाव - बहिणाबाई महोत्सवाचे २५ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर स्थापना उत्सव तसेच ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण राहणार असल्याची माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषद सांगितले.
यावेळी उद्योजक रजनीकांत कोठारी, महोत्सवाचे सांस्कृतिक समन्वयक विनोद ढगे उपस्थित होते. परदेशी म्हणाले,बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन दि. २५ ते २९ जानेवारी दरम्यान सागर पार्क, मैदान येथे होणार आहे. महोत्सवात २८० स्टॉल असून यात १५० महिला बचत गटांचे विविध उद्योगांचे स्टॉल असणार आहेत. तसेच खान्देशी खाद्य पदार्थांचा खाद्य महोत्सव असेल. सोबत खान्देशची संस्कृती व लोककला उत्सवात विविध कलाकारांचे विशेष कार्यक्रम होतील. तसेच दि. २२ रोजी महाआरती दुपारी साडेचार वाजता सागर पार्कवर केली जाईल. पाच दिवसांच्या या महोत्सवाचे उद्घाटन ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दि. २५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून आमदार सुरेश भोळे, भालचंद्र पाटील, उद्योगपती रजनीकांत कोठारी यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.