राष्ट्रीय महामार्गावरील अपघातातील मयतांवर जळगाव व धुळ्यात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: March 27, 2017 16:10 IST2017-03-27T16:10:24+5:302017-03-27T16:10:24+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वर ट्रक व चारचाकीच्या अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल़े अपघातातील मयतांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातातील मयतांवर जळगाव व धुळ्यात अंत्यसंस्कार
>जळगाव, दि.27 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वर ट्रक व चारचाकीच्या अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल़े अपघातातील मयतांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वरणगावजवळ सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात ठार झालेले सुधीर शांताराम सोनवणे (वय 43 रा.दादावाडी, जळगाव, मुळ रा.नायगाव, ता.यावल) यांच्यावर दुपारी जळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले तर गणेश अभिमन्यू फुलपगारे (रा.धुळे, ह.मु.पिंप्राळा, जळगाव) यांच्यावर धुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलपगारे हे जळगाव येथे स्काऊट गाईड कार्यालयात लिपिक होते. ते मुळचे धुळे येथील रहिवाशी होते.
फुलपगारेंच्या सौभाग्यवती अधिकारी
गणेश फुलपगारे यांची सौभाग्यवती सिमा सोनवणे या जळगाव स्काउट गाईड कार्यालयात वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या सहका:याकडे लग्नाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम असल्याने ते सर्व जण अकोला येथे गेले होते. या अपघातात त्याही गंभीर जखमी झाल्या आहेत. गणेश सोनवणे यांच्या मालकीची कार असल्याने त्यातच हे सर्वजण गेले होते. सोनवणे हे स्वत:च कार चालवत होते. ते मार्केटींगचे काम करतात. त्यांना स्पृहा ही 11 महिन्याची मुलगी आहे.वडील शांताराम चावदस सोनवणे, आई सिंधूबाई, सौभाग्यवती व मुलगी असे दादावाडीत एकत्र राहत होते. मोठे भाऊ रवींद्र हे देखील येथेच वरच्या मजल्यावर राहतात. सोनवणे यांना दोन बहिणी असून त्या विवाहित आहेत.