Jalgaon: पोलिसांत तक्रार केल्याने तरुणीला दिली बलात्काराची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
By Ajay.patil | Updated: July 18, 2023 14:31 IST2023-07-18T14:30:38+5:302023-07-18T14:31:11+5:30
Jalgaon: जळगाव शहरातील विविध भागांमध्ये विवाहिता व एका तरुणीचा विनयभंग केल्याचा दोन घटना घडल्या असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाणे व शनिपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon: पोलिसांत तक्रार केल्याने तरुणीला दिली बलात्काराची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
- अजय पाटील
जळगाव - शहरातील विविध भागांमध्ये विवाहिता व एका तरुणीचा विनयभंग केल्याचा दोन घटना घडल्या असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाणे व शनिपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
पहिल्या प्रकरणात शहरातील एका भागात पोलिसात तक्रार केल्याचे वाईट वाटल्याने एकाने तरुणीच्या घरात घुसून तिला अश्लिल शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली. पोलीसात तक्रार केली, म्हणून थेट तरुणीला बलात्कार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून कल्पेश उर्फ बाळा शिंपी (वय.२९) याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीवरून शिंपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रमेश शेंडे हे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत जुने जळगाव भागात राहणाऱ्या एका विवाहितेचा पाठलाग करून, विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात सचिन मिस्तरी (वय ३४ व संतोष गवळी (वय ३२) (दोन्ही रा.कांचन नगर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी हे करत आहेत.