जळगाव : बाप्पाला निरोप द्यायला गेलेल्या तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

By सुनील पाटील | Updated: September 9, 2022 20:32 IST2022-09-09T20:31:54+5:302022-09-09T20:32:31+5:30

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

Jalgaon A young man who went to bid farewell to ganesh visarjan ananta chaturdashi drowned in the dam | जळगाव : बाप्पाला निरोप द्यायला गेलेल्या तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

जळगाव : बाप्पाला निरोप द्यायला गेलेल्या तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

जळगाव : गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या भगवान नामदेव राठोड (वय १८, रा. समता नगर) या तरुणाचा शहरानजीक असलेल्या कांताई बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान राठोड हा आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत समता नगरात वास्तव्याला होता. भावासोबत बांधकामाचे स्टाईल बसविण्याचे काम करत होता. शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समता नगरातील गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मंडळाच्या तरूणांसोबत तो शहरानजीक असलेल्या गिरणा नदीवरील कांताई बंधाऱ्यावर  गेला होता. बाप्पाच्या विसर्जनासाठी काही तरुण बंधाऱ्यात उतरले असता त्यांच्यासोबत भगवानदेखील उतरला होता. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात वाहत्या पाण्यात पाय घसरून पडला.

यावेळी उपस्थित तरूणांनी आरडा ओरड केली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. त्याला पाण्याच्या बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. नातेवाईक, कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला होता. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ विष्णू, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Jalgaon A young man who went to bid farewell to ganesh visarjan ananta chaturdashi drowned in the dam

टॅग्स :Jalgaonजळगाव