जळगाव जिल्ह्यातील ५०० ट्रान्सपोर्टधारकांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 20:02 IST2018-07-20T19:57:34+5:302018-07-20T20:02:56+5:30

डिझेल वाढलेल्या किंमती, ई-वे बिल मधील इतर मागण्यासांठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँंगेस नवी दिल्लीतर्फे शुक्रवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जळगाव जिल्ह्यातीलही ट्रान्सपोर्टमालक सहभागी झाले असून, सुमारे ५०० ट्रान्सपोर्टधारकांनी आपला व्यवसाय बंद ठेवला आहे.

Jaladgaon 500 transporter holders of Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील ५०० ट्रान्सपोर्टधारकांचा कडकडीत बंद

जळगाव जिल्ह्यातील ५०० ट्रान्सपोर्टधारकांचा कडकडीत बंद

ठळक मुद्देडिझेल दरवाढ, ई- वे बिलाच्या जाचक अटींविरोधात बेमुदत संपजळगाव जिल्ह्यातील ५०० जणांचा सहभागशालेय वाहतुक करणाऱ्या वाहनचालकांचा पाठिंबा

जळगाव : डिझेल वाढलेल्या किंमती, ई-वे बिल मधील इतर मागण्यासांठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँंगेस नवी दिल्लीतर्फे शुक्रवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जळगाव जिल्ह्यातीलही ट्रान्सपोर्टमालक सहभागी झाले असून, सुमारे ५०० ट्रान्सपोर्टधारकांनी आपला व्यवसाय बंद ठेवला आहे.
केंद्र शासनाने ट्रान्सपोर्ट धारकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जळगाव शहरातील ३०० ट्रान्सपोर्टधारक व इतर तालुक्यांमधील २०० असे एकुण ५०० ट्रान्सपोर्ट धारकांनी कडकडीत बंद पुकारला आहे. एका ट्रान्सपोर्टवर १० ते १५ कर्मचारी कामाला आहेत. यामध्ये सुमारे दोन हजार ट्रकची संख्या असून, जळगावातील ट्रान्सपोर्टनगरात ५०० ट्रक उभ्या आहेत. तर इतर तालुक्यांमधील ट्रकही बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनाला शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया चालकांनी देखील पाठिंबा दिला होता. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे हाल झाले.

Web Title: Jaladgaon 500 transporter holders of Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.